वाशिम : मराठा कुणबी उमेदवाराला ओबीसी मतदारांनी मतदान करू नये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथील सभेत केले होते. त्यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी मराठा, कुणबी काय दरोडेखोर आहेत का? असा सवाल उपस्थित केला होता. आता बच्चू कडू यांच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 


मराठा कुणबीपासून सावध राहा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावर बच्चू कडूंनी म्हटलं की, सावध रहा म्हणजे ते लुटरे आहेत का? दरोडेखोर आहेत का? हे त्यांनी कदाचित पाहिलं असेल त्यांनी सांगितले पाहिजे. प्रकाशजी जेव्हा असं बोलता तेव्हा खरं तर दुःख वाटतं. त्यांच्या बोलण्यावर काही शब्द नाही ते वंशज आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही सांभाळून आहोत, असे त्यांनी म्हटले होते.  


प्रकाश आंबेडकरांचे बच्चू कडूंना चोख उत्तर


आता यावरून प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांना चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ज्यांना जे कळत नसेल त्यांनी माझ्या मतांना बोलू नये. जेव्हा मी काही बोलत असेल आणि ते समजून घेऊन बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणे मी उचित समजतो. नाहीतर मी इग्नोर करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. 



जरांगे पाटील गावरान राजकारण करतात : प्रकाश आंबेडकर


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा काल वाशिमच्या मालेगाव शहरात पोहचली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावर बोलताना सत्ताधारी, विरोधकांसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,  जरांगे पाटील यांची मागणी आहे की, ओबीसीतून आरक्षण मिळावं. मात्र राजकीय पक्षांच्या वतीने चुकीची मागणी जरांगे करत आहे, असं  न म्हटल्याने आता सामान्य विरोध करत आहे. म्हणून सामान्य माणूस आता आमच्या ताटातले आरक्षण देऊ नये, असं म्हणतात. ओबीसी आता मराठ्यांना मतदान करणार नाही. 1977 साली नामांतराची परिस्थिती निर्माण झाली तशी आज परिस्थिती निर्माण झाली होती. लवकर तोडगा निघाला नाही तर पटलेले आंदोलन दंगलीत होईल. फक्त आग लावण्याची वेळ आहे. महाराष्ट्रात शांतता नांदावी. या निवडणुकीत ओबीसी समाज मराठ्यांना मतदान करणार नाही तर मराठा ओबीसींना मतदान करणार नाही, अशी परिस्थिती आहे. आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. केंद्र आणि राज्याने आरक्षण दिले तर ते कोर्ट तपासेल. दंगल करायची असेल तर दुसऱ्याच्या घरच्यांचा वापर होतो आपले घरातले नाही. जरांगे पाटील गावरान राजकारण करतात. गरीब मराठ्यांना आरक्षणा मागणी करतात. त्यामुळे श्रीमंत मराठ्यांमध्ये धडकी भरली, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


Bacchu Kadu : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीसाठी शड्डू ठोकला; राजू शेट्टी, मनोज जरांगेसह एमआयएम सोबतही खलबतं