वर्धा : वर्ध्याच्या (Wardha News) हिंगणघाटमध्ये तरुणांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. जेठानंद राजपूत असं त्यांचं नाव असून ते आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinghanghat Police Station) एकाला ताब्यात घेतलंय. वर्ध्यावरून बसने प्रवास करत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर जेठानंद राजपूत यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीवर कारवाईची मागणी केली. प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.
आठ ते दहा जणांनी मारहाण केली (Wardha Crime News)
जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. जेठानंद राजपूत हे RSS चे वर्धा जिल्हा संघचालक होते. बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले असता वादातील संबंधित युवकांने वाद घातला. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर बोलावत नांदगाव येथे बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून आठ ते दहा जणांनी मारहाण केली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.
रात्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण
घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले. याबाबत सुद्धा पोलिसांकडून (Police) माहिती घेतली जातं आहे. सायबर टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर भडकवणारे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे. रात्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळली. संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर हिंगणघाटेमध्ये तणावाचे वातावण निर्माण झाले होते. परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
हे ही वाचा :