Walmik Karad Mcoca Santosh Deshmukh Murder Case बीड: वाल्मिक कराड (Walmik Karad Mcoca) याला सध्या केज पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्याला थोड्याच वेळात बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात (Beed Kej Court) आणण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात (Beed District Court) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला आहे. आता बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
केज न्यायालयात वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश-
वाल्मिक कराडच्या (Walmik Karad Mcoca) सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज न्यायालयाच्या बाहेर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत इतर प्रकरणातील पक्षकारांना प्रवेश दिला जात नाहीय. न्यायालयाचे नियमित कामकाज सुरु आहे, फक्त वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. केज न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून प्रत्येकाची तपासणी करुनच न्यायालयाच्या आवरात सोडलं जातंय.
वाल्मिक कराडवर मकोका, परळीत पुकारला बंद- (Parli Close Today)
परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धार्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे. काल वाल्मीक कराड यांच्यावर नको का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते. तरीही परळी शहरातील निम्मी बाजारपेठ आताही बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बीडच्या पांगरी गावात तरुण टॉवरवर चढले-
वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर वाल्मिक कराडच्या मूळगावी पांगरीत पाच तरुण टॉवरमध्ये चढले आहेत. हे तरुण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. वाल्मीक कराडवर राजकीय आणि जातीय द्वेषातून कारवाई झाल्या असल्याचा आरोप ही नागरिक करत आहेत. पांगरी गावातील पुरुष महिला एकत्रित येऊन वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत.
वाल्मिक कराडवर मकोका, आज कोर्टात हजर काय होणार?, VIDEO:
संबंधित बातमी:
Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?