Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Kej Court Beed: वाल्मिक कराडला (Walmik Karad) खंडणी प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या केज न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान न्यायालयात नेमकं काय घडलं?, याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 


न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. 


आरोपी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?


आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी १० दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली?, हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला?, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच  वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा...आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले. 


विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेशी काही संबंध नाही- सिद्धेश्वर ठोंबरे


मीडिया ट्रायलमुळे वाल्मिक कराड यांच नाव या गुन्ह्यात घेण्यात आलं आहे. खंडणीच्या तक्रारीत कराड यांच्याशी परळीत ऑफिसमध्ये खंडणीची मागणी झाली असा आहे. पण वेळ आणि कोणत्या दिवशी खंडणी मागितली त्याचा उल्लेख नाही. कराड यांचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेशी काही संबंध नाही. आरोपीने 15 दिवस कोठडी भोगली आहे. नवीन कस्टडीची गरज नाही, असं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले. 


संबंधित बातमी:


Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: दोन घडामोडींमुळे शंकेची पाल चुकचुकली; अंजली दमानिया यांनी घटनाच सांगितली!