मुंबई : आतापर्यंत तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असाल, ज्यांमध्ये कधी करमणूक, तर कधी गंभीर घटना पाहायला मिळाली असेल. गेल्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यात कुठली करमणूक किंवा कुठली गंभीर घटना नाही, तर तो सुरेल आवाजाच्या ‘पावशा’चा व्हिडीओ आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पावशाचीही चर्चा सुरु होते. पावसाच्या आगमनाचा संदेश देणारा पक्षी म्हणजे पावशा. आज सोशल मीडिया असल्याने शहरातही या पक्षाचा आवाज या व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचतो आहे. पण ग्रामीण भागात शेतकऱ्याशी या पक्षाचं नातं अत्यंत घट्ट आहे. पीक पेरणीच्या काळात ‘पेरते व्हा...पेरते व्हा...’ असं आपल्या सुरेल आवाजात पावशा शेतकऱ्यांना सांगत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं पावशाच्या आवाजाकडे बारीक लक्ष असते. इंग्रजीत या पक्षाला ब्रेनफिव्हर बर्ड किंवा कॉमन हॉक कुकू असंही म्हणतात. VIDEO - पावशा पक्षाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्व, पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांच्याकडून खास माहिती : पावशा पक्षी राखाडी रंगाचे असतो, तर त्याच्या शेपटीवर पट्टे असतात. नर आणि मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. पावशा भारतात सर्वत्र आढळतो. विशेषत: झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. VIDEO - मन सुखावणारा पावशाचा सुरेल आवाज :