मुंबई: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे व्हॅलेंटाईन असल्याचं वक्तव्य तावडेंनी केलं आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसनं शिवसेनेला 40 जागांचं गिफ्ट दिलं आहे तर शिवसेनेनं 10 जागांचं गिफ्ट काँग्रेसला दिल्याचा आरोप तावडेंनी केला आहे. शिवाय सेटिंग झालेल्या जागांवर दोघेही कमी प्रचार करणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी तावडेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ‘महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. पण उद्धव ठाकरे भलत्याच विषयावर बोलत आहेत. ज्याचा महापालिकेशी काहीही संबंध नाही.’

याबरोबरच तावडेंनी शिवसेनच्या उमेदवारांच्या संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘गेल्या निवडणुकांनंतर शिवसेना उमेदवारांच्या उत्पन्नात एवढी कशी वाढ झाली?’ असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी अजून मांजरीच्या जबड्याला तरी हात घातला का?: राणे

मुंबईत शिवसेनाच नंबर वन राहील : शरद पवार