Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणाचा जीआर (Maratha Reservation GR) निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये जंगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. त्यात दोन्ही बाजूने रोज नव्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता या शाब्दिक वादाने टीकेचे टोक गाठलं का असा प्रश्न पडू लागला आहे. कारण, 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा, असे जर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे म्हणणे असेल तर मनोज जरांगे यांच्या हातात AK-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा. अशी संतप्त प्रतिक्रिया दिल्या नंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा, मनोज जरांगे यांना फाशी देण्याची भाषा केली आहे.  

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : आम्ही लिहून ठेवू, जीव गेला तर जरांगेला फाशी द्या'

'आमचा जीव गेला तरी चालेल. मात्र ओबीसी आरक्षण लढा सुरु राहील. आम्ही लिहून ठेवू, जीव गेला तर जरांगेला फाशी द्या' असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना डिवचलं आहे. मनोज जरांगे यांना गरीब मुलांसाठी आरक्षण हवे, त्यात नोकरी मिळत आहे. मात्र जरांगे यांना राजकीय आरक्षण हवे म्हणून त्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Maratha Reservation GR: शासनाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा

शानाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा आहे, हे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. या जीआर मध्यला पात्र शब्द सुद्धा वगळावा. पहिल्यांदा मात्र हा शब्द नव्हता, नंतरच्या एक तासात जीआरमध्ये पात्र शब्द टाकला आहे आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतलेला आहे. हा सगळा निर्णय दबावात झालेला आहे, एखादा प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सगळं काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्या आहे, यात जर काही गरीब लोक असलेले त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकी आहे. असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले

Continues below advertisement

आणखी वाचा