विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच या प्रकरणाचं प्रतिनिधित्व ब्रिटेन सरकारच्या क्राऊन प्रॉसीक्यूशन सर्व्हिसच्या मध्यमातून होत आहे.
सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली एक पथक कोर्टात उपस्थित राहणार आहे. यासाठी सीबीआयचे पथक रविवारीच लंडनला रवाना झालं.
मल्ल्याने मार्च 2016 मध्ये भारतातील विविध बँकांचं तब्बल नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलं. त्याच्या प्रत्यर्पणासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात सुनावणी सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याच्या वकीलाने कोर्टासमोर निवेदन देताना, आपला अशील भारतात सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं.
मल्ल्याच्या वकीलाच्या युक्तीवादानंतर भारताकडून त्याच्या सुरक्षेसंदर्भात रुपरेखा तयार करण्याचं काम सुरु होतं. आज याबाबत भारताकडून कैद्यांच्या सुरक्षेविषयी कोर्टाला माहिती दिली जाऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्र सरकार पळपुट्या विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस अर्थात विश्रामगृह देण्याच्या तयारीत आहे. अर्थात हे मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी आहे.
संबंधित बातम्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस देण्यास राज्य सरकारची तयारी!
आर्थर रोडमध्ये जिथे कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक आणि लगेच जामीन
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींकडून ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट