मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
शिवाय या परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा आणि गारपीटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मनमाड, पंढरपूर, सांगलीमध्ये शनिवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मनमाडमध्ये पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांचं शेड कोसळलं आहे, तसंच सांगलीतील जत तालुक्यात एका शेतकऱ्याचं अंदाजे 23 लाखाचं नुकसान झालं आहे.
येत्या 48 तासात राज्यात गारपीटीसह अवकाळी पावसाचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2018 05:08 PM (IST)
येत्या दोन दिवसांत राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -