पोचेफस्ट्रूम : यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 173 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 10 विकेट्स राखून पार केलं. यशस्वी आणि दिव्यांशनं सलामीसाठी धावांची निर्णायक भागीदारी रचली. यशस्वीनं 105 तर दिव्यांशनं 59 धावांची खेळी केली. या विजयासह युवा टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा अंडर19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
यंग टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 10 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 173 धावांचं माफक आव्हान भारताने यशस्वी जैस्वालचं शतक आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने 8 चौकार आणि 4 षटकारांचा मदतीने 113 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी केली तर दिव्यांशनं 6 चौकाराच्या मदतीने 59 धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सुफडासाफ, टी 20 मालिका 5-0 ने जिंकली
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांच्या टिच्चून माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव 172 धावांवर आटोपला. सलामीवीर हैदर अली 56, कर्णधार रोहिल नाझीर 62 आणि मोहम्मद हॅरीस 21 वगळता पाकच्या एकाही फलंदाजांला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून सुशांत मिश्राने 3, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन-दोन तर अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईकर जोडगोळीने एक-एक विकेट घेतली.
भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत सातव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा संघ 2000 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा भारत चॅम्पियन बनला होता. यानंतर 2006 मध्ये उपविजेता, 2008 मध्ये विजेता, 2012 मध्ये विजेता, 2016 मध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विजेता बनला होता. आता भारताला पाचव्यांदा विजेता होण्याची संधी आहे.
पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात टीम इंडिया 'यशस्वी', अंडर 19 विश्वचषकात फायनलमध्ये एन्ट्री
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
04 Feb 2020 08:37 PM (IST)
प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत या विश्वचषकात अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मात करुन सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -