Ratnagiri : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज चिपळूनमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपच्या सभेला होणाऱ्या गर्दीवरुन टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहापट गर्दी असते, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत.
उदय सामंत म्हणाले, "उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील सभा ही रस्त्यावरची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या अशा कितीही सभा झाल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरिल नेते काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारतील. पक्षप्रमुखाची सभा शिवाजी पार्कला होते ती सभा आता रस्त्यावरुन घ्यावी लागते. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा जनता त्यांना उत्तर देईल. स्वतःच्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी, हसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना हे करावंच लागतं. उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात कुठेही चौकशी लावीवी. काय परिणाम होतील हे महाराष्ट्राला सांगावेत. मी बोलत नाही संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही असं समजू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिलाय.
शिवाजी पार्कला सभा घेणारे रस्त्यावर आले. रस्त्यावर आणि गल्लीतमध्ये सभा घेणा-यांनी आत्मचिंतन करावे. मी लाचारपणे त्यांच्याकडे गेलेलो नाही. मला अडीच वर्षांपूर्वी त्यांनी बोलावलं त्यांनी शपथ घेऊन सांगावं.उद्धव ठाकरे यांच्या स्क्रिप्ट लिहिलेली आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा, असेही उदय सामंत या वेळी बोलताना म्हणाले.
2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात?
बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत. हे सांगण्यासाठी मी भाजपला कमळाबाई म्हणतो. भाजपला वाटत होते की, शिवसेना संपेल. 2014 सालीच हे शिवसेना संपवायला निघाले होते. 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. भाजप सध्या म्हणतोय हे पक्षप्रमुख नाही. तर 2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात? तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो.आमच्या महायुतीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करा, असे म्हणालो होतो. त्यासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या. कशासाठी माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी आला होतात? असा सवालही ठाकरेंनी केलाय.
'स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात'
घराणेशाहीबाबत बोलणारा माणून घरंदाज असायला हवा. त्याचे घरदार, कुटुंब सांभाळून तो घराणेशाहीबाबत बोलला तर मी समजू शकतो. स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात. 2014 आणि 2019 ला माझा पाठिंबा घेताना यांना मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. मी म्हणतो मोदी यांचा शिवप्रेम हे बेगडी आहे. आधी कोकणात आले पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला, अशी टीकाही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या