अंकारा (तुर्कस्तान): तुर्कस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला. सीरीयाच्या सीमेजवळ असणाऱ्या गजनीटेप शहरात एका लग्नसमारंभात हा हल्ला झाला. आयसिसच्या एका 12 वर्षीय आत्मघातकी हल्लेखोरानं हा स्फोट घडवून आणल्याचं समजतं आहे.


 

राष्ट्रपती रेसेप तैयप एरदोगन यांनी राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर माहिती दिली की, हल्लेखोर हा 12 ते 14 वर्षामधील होता. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे तर 69 जण जखमी झाले असल्याची माहित देण्यात आली आहे. शनिवारी रात्री 11च्या सुमारास हा हल्ला झाला.

 



याआधी दोनच दिवसांपूर्वी सुरक्षा दलाला टार्गेट करत तुर्कस्तानच्या काही भागात स्फोट घडवण्यात आले होते. ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 220 जण जखमी झाले होते. 19 तारखेला झालेल्या या हल्ल्यात पोलीस आणि सैन्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.