Tuljapur Temple धाराशिव श्री तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani Temple) शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. मंदिर संस्थानच्या खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा हि मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे. तसेच मंत्रोपचाराने तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा खळबळजनक आरोप हि पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सध्या तुळजाभवानी मंदिर प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून तलवारी बाबत माहिती घेऊन सांगतो म्हणत मंदिर संस्थानने सावध भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.

Continues below advertisement


पूजा करून शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांचा दावा


पुढे आलेल्या माहितीनुसार, पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्यामार्फत पूजा करून शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांचा दावा आहे. तसेच होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती ही तलवारीमध्ये काढून घेतल्याचे हि पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. भक्तांना दर्शन घेण्यासाठी, गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी, अशी मागणी आता पुजाऱ्यांकडून करण्यात ये आहे. तर श्री तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला माहिती न देता गणेश्वर द्रविड शास्त्रीच्या मार्फत मंदिर संस्थांनी होम हवन विधी केल्याचा आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर श्री तुळजाभवानीच्या खजिना खोलीतील गायब झालेली तलवार तात्काळ तुळजाभवानीच्या जवळ आणून ठेवण्याची पुजाऱ्यांची मागणी असताना तलवारी बाबत माहिती घेऊन सांगतो म्हणत मंदिर संस्थानने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता मंदिर प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


आणखी वाचा