परभणीत 13 लाखांच्या तुरीसह ट्रक पळवला, शेतकरी हवालदिल
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2017 08:19 PM (IST)
परभणी : परभणीत 13 लाख 14 हजार 550 रुपयांच्या तुरीसह चोरट्यांनी भरलेला तुरीचा ट्रक पळवला आहे. वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे. यामध्ये 9 शेतकऱ्यांचा माल चोरीला गेला. शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी ट्रक आणला होता. मात्र शनिवारी चोरट्यांनी ट्रकसह तूरही पळवली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. नवा मोंढा पोलीस ठाण्यात आज अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे तूर खरेदी बंद आहे, तर दुसरीकडे चोरट्यांनी मालावर डल्ला मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान यापूर्वी उस्मानाबादमध्येही तूर चोरीची घटना घडली होती. उस्मानाबादच्या वाशी बाजार समितीत 44 पोती तूर चोरीला गेली होती. शेतकरी बाजार समित्यांमध्ये तुरीची राखण करण्यासाठी तळ ठोकून आहेत. मात्र तरीही चोरट्यांकडून तुरीवर डल्ला मारला जात आहे. संबंधित बातम्या :