Zero Shadow Day 2023 : उन्हातून जाताना कायम आपल्याबरोबर राहणारी सावली कधीही आपली साथ सोडत नाही असे म्हटले जाते. परंतु, वर्षातून दोन दिवस असे येतात की, या दिवशी आपली सावली आपली साथ सोडते. आज असचं काहीसं चित्र हैदराबादमध्ये तसेच आसपासच्या शहरामध्ये दिसणार आहे. शून्य सावली दिन (Zero Shadow Day 2023)  नेमका काय आहे? हे सावलीहीन दृश्य किती काळ टिकेल? शून्य सावली दिन नेमका कोणत्या कारणासाठी पाळला जातो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


शून्य सावली दिवस म्हणजे काय?


ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावाच्या अक्षांशाएव्हढी होते, त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली येते व अदृश्य होते. या दिवसाला 'शून्य सावलीचा दिवस' असे म्हणतात. जर आपण आजच्या शून्य सावलीबद्दल बोललो तर ते 3 ऑगस्ट 2023 रोजी 12.52 वाजता होईल. त्याचा सर्वाधिक प्रभाव हैदराबादजवळ बसणार आहे. 


शून्य सावली कशी अनुभवाल?


आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.


भर दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर


वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. 


आजच्या झिरो शॅडो डे मध्ये काय खास आहे?


अक्षांशानुसार, त्याचा प्रभाव हैदराबाद आणि आसपास दिसून येईल. कृपया कळवा की हैदराबादचे अक्षांश 17.3850°N आहे. अशा परिस्थितीत, यावेळी वस्तू आणि सूर्याचा कोन पूर्णपणे सरळ असेल आणि काही काळ सावली दिसणार नाही.


महत्त्वाच्या बातम्या :


Job Resignation : 10-10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक का? भडकणाऱ्या बॉसला वैतागली, तरुणीने तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली!