United Kingdom News : सध्याच्या आधुनिक जगात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात फोन पाहायला मिळतो. प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं, म्हणजे प्रत्येकजण जणू मोबाईलला चिकटलेला असतो. सध्या तंत्रज्ञानामुळे अख्ख जग जवळ आलं आहे. लोक मोबाईलवर इतके अवलंबून आहेत की, आजकाल बहुतेक काम मोबाईलवरूनच कुठेही करता येतात. त्यातच सोशल मीडियाच्या व्यसनामुळे लोक तासभरही आपला फोन स्वत:पासून वेगळा ठेवत नाहीत. 


कामावर मोबाईल वापरणं महागात


कोणीही कामात कितीही व्यस्त असलं तरी, काही वेळाने फोन चेक करायला विसरत नाही. काही ऑफिसमध्ये तर फोनवर सर्व कामं होतात. पण, काही ठिकाणी फोन वापरण्याबाबत कडक नियम आहेत. याच नियमांचा फटका एका महिलेला बसला आहे. कामावर फोन वापरल्याबद्दल एका महिलेला तिच्या नोकरीतून काढून टाकण्यात आलं. ब्रिटनमधील मँचेस्टर रेस्टॉरंटमध्ये फोन वापरल्यामुळे एका महिलेला नोकरी गमवावी लागली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, शिफ्ट सुरू होण्यापूर्वी ती तिचा फोन वापरत होती.


मोबाईल वापरल्यानं महिलेला नोकरीवरून हटवलं


मीडिया रिपोर्टनुसार, ही महिला ब्रिटनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. कामादरम्यान फोन वापरताना आढळून आल्याने या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ड्युटीवर मोबाईल वापरल्यामुळे महिलेला मँचेस्टर रेस्टॉरंटमध्ये नोकरी गमवावी लागली. सोफी अल्कॉक असं या महिलेचं नाव आहे. तिने बॉसने कामावरून काढल्याचा व्हिडीओही बनवला होता. पीडित महिलेच्या दाव्यानुसार, तिला नोकरीवरून काढून टाकणं पूर्णपणे चूकीचं होतं.


सोफीनं सांगितलं की, तिने स्वतःचा आणि बॉसमधील वाद देखील रेकॉर्ड केला. यादरम्यान तिच्या बॉसने सांगितलं की, ती कामावर चार तास फोन वापरत होती. त्यानंतर सोफीने तिच्या फोनचा स्क्रीन टाइम उघडला, ज्यामध्ये तिने दावा केला की, त्या दिवशी फोन फक्त 2 तास 40 मिनिटांसाठी वापरला गेला होता.


बॉसचा आरोप निराधार असल्याचा महिलेचा दावा


सोफीने सांगितलं की, तिने कामाची शिफ्ट सुरु शिफ्ट सुरू होण्यापूर्वी आणि शिफ्ट संपल्यानंतर फोन वापरला होता. यावेळी सोफीनं युक्तिवाद करत सांगितलं की, जर तिने तिचा फोन स्वयंपाकघरात वापरला असता तर ऑर्डर मिळाली नसती. दरम्यान, सध्या या महिलेचा व्हिडीओ आणि बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.


संबंधित इतर बातम्या :


पत्नीला धोका दिला तर, जाईल नोकरी; 'या' कंपनीचा अजब नियम, नेमकं कारण काय?