Vivo Y55s 5G: विवोने वाय सीरीजचा विस्तार करत आणखी एक नवीन 5G फोन लॉन्च केला आहे. Vivo Y55s 5G (2023) असे लॉन्च करण्यात आलेल्या नवीन फोनचे नाव आहे. याच नावाचा एक फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र हा मॉडेल चिनी फोनपेक्षा बराच वेगळा आहे. नवीन Vivo Y55s 5G मध्ये फुल एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर, 6GB पर्यंत RAM आणि 5000mAh बॅटरी सारखी फीचर्स आहेत.
चला तर या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Vivo Y55s 5G (2023) Price : किंमत
Vivo Y55s 5G (2023) फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत NTD 7,990 (सुमारे 21,300 रुपये) आहे. तसेच याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत NTD 8,490 (सुमारे 22,600 रुपये) आहे. हा फोन गॅलेक्सी ब्लू आणि स्टार ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
Vivo Y55s 5G (2023) Feature : फीचर्स
Vivo Y55s 5G (2023) फोन Android 13-आधारित FuntouchOS 12 वर कार्य करतो. या फोनमध्ये 6.58 इंच फुल एचडी + IPS LCD डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल आहे. यासोबतच डिस्प्लेमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो उपलब्ध आहे. सेल्फीसाठी वॉटर ड्रॉप नॉच आहे. याशिवाय फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनेही वाढवता येते.
Vivo Y55s 5G (2023) : कॅमेरा
कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्टची सुविधा मिळेल. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ज्यामध्ये AI फेस फेस अनलॉक सिस्टम देखील उपलब्ध आहे.
Tecno Spark Go
Tecno च्या एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Tecno Spark Go 2023 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. हा आगामी डिव्हाईस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर डिस्प्ले करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा IPS डिस्प्ले, आस्पेक्ट रेशो 20:9 आणि ब्राइटनेस 480 nits असेल. याची स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते.