Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला पोट धरुन हसवणारे असतात, तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे, जो खूप धक्कादायक आणि तितकाच तुम्हाला विचारात पाडणारा आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर, छातीवर एक ऑक्टोपस (Octopus) चिकटला आहे. डॉक्टरांनाही हा ऑक्टोपस त्याच्या चेहऱ्यापासून वेगळा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.


नेमकं घडलं काय?


त्याचं झालं असं की, हा व्यक्ती समुद्रात पोहायला गेला आणि तितक्यात एका ऑक्टोपसने त्याच्या चेहऱ्यावर झडप घातली. ऑक्टोपस या व्यक्तीत्या चेहऱ्यावर अत्यंत वाईटरित्या चिकटून बसला. हा हाताने काढून चेहऱ्यापासून वेगळाही होत नव्हता, शेवटी या व्यक्तीवर हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली.


डॉक्टरकडून ऑक्टोपसला शरीरापासून वेगळं करण्याचे प्रयत्न


व्हायरल व्हिडिओमध्ये हा व्यक्ती डॉक्टरांसमोर झोपल्याचं दिसत आहे आणि त्याचा संपूर्ण चेहरा, मान आणि छाती ऑक्टोपसच्या तावडीत सापडल्याचं दिसत आहे. यावेळी डॉक्टर या व्यक्तीच्या शरीरापासून ऑक्टोपसला काढण्यासाचा पूरेपूर प्रयत्न करत आहेत. पण हा ऑक्टोपस खूप घट्ट चेहऱ्याला चिकटला आहे, त्यामुळे डॉक्टरांनाही नाके नऊ आले.


अखेर ऑक्टोपसची सुटका


तरीही डॉक्टरांनी हळूहळू त्या माणसाच्या शरीरावर चिकटलेल्या ऑक्टोपसला वेगळं केलं. यूजरने या व्हिडिओचा दुसरा भाग देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डॉक्टर त्या माणसाच्या चेहऱ्यावरून ऑक्टोपस काढत आहेत. छातीपासून ऑक्टोपस वेगळा करण्यात जास्त कष्ट आले नाही, पण चेहऱ्यापासून ऑक्टोपसला वेगळं करणं फार कठीण होतं.






व्हिडीओच्या शेवटी असं दिसून येतं की, खूप कष्टानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चिकटलेल्या ऑक्टोपसला काढून टाकलं. ऑक्टोपसला काढल्यानंतर तो व्यक्ती खूप खुश झाला. तर समुद्रात पोहायला गेल्यावर अनेक लोकांच्या शरीराला यापूर्वीही ऑक्टोपस चिकटल्याच्या अनेक घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत. अशा स्थितीत ऑक्टोपसला शरीरापासून वेगळं करणं फार अवघड होऊन बसतं. त्यामुळे समुद्रात जाताना नेहमी काळजी घ्यावी, जलचरांची काळजी घेऊनच समुद्रात पोहोण्यासाठी जाणं योग्य ठरेल.


हेही वाचा:


जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय?