Doraemon Theme Song: डोरेमॉन (Doraemon) हे एक प्रसिद्ध कार्टून आहे. या कार्टूनमधील डोरेमॉन, नोबिता, शिझुका, जियान ही पात्रं म्हणजे अनेकांचे बालपणीचे सोबती, ज्यांना पाहून बरीच मुलं मोठी झाली. डोरेमॉन (Doraemon) हे कार्टून फक्त भारतातच नाही, तर जगभरातील (World) विविध देशांमध्ये मोठ्या आवडीने पाहिलं जातं. जगातील प्रत्येक लहान मुलगा डोरेमॉन या पात्राला ओळखत असेल, एवढी त्याची प्रसिद्धी (Popularity) आहे. प्रत्येक देशात त्या-त्या भाषांमध्ये डोरेमॉन प्रदर्शित केलं जातं, याचं टायटल साँग देखील (Doraemon Title Song) प्रत्येक ठिकाणी वेगळ्या अंदाजात गायलं गेलं आहे.


डोरेमॉन टायटल साँगचा वेगळा अंदाज


आता याच्याशीच संबंधित एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे, ज्यात काही कोरियन ऑर्केस्ट्रा कलाकारांनी 9 विविध भाषांमध्ये (Languages) डोरेमॉन थीम साँग गायलं आहे. त्यांनी डोरेमॉनच्या टायटल साँगला (Doraemon Title Song) म्युजिकचा आवाज देखील तोंडाने दिला आहे, यात म्युजिकसाठी कोणत्याही वाद्याचा (Music Instrument) वापर केला गेलेला नाही. हा व्हिडीओ युट्युबवर MayTree नावाच्या युट्युब चॅनलवरुन अपलोड करण्यात आला आहे, जो एक कोरियन ग्रुप आहे.


हिंदी भाषेतही गायलं डोरेमॉन टायटल साँग


कोरियन कलाकारांचा हा ग्रुप जगभरात त्यांच्या गायन कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. या यूट्यूब व्हिडिओमध्ये, 5 कोरियन माउथ ऑर्केस्ट्रेटर 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये डोरेमॉनचं थीम साँग गात असल्याचं दिसून येतं. हे कलाकार गाण्याचं म्युजिक देखील स्वत: तोंडाने देत आहेत. हे थीम साँग इंडोनेशियन व्हर्जनने सुरू होतं. मग त्यानंतर ते फ्रेंच, कोरियन, चिनी, व्हिएतनामी, लॅटिन स्पॅनिश, जपानी, बास्क आणि शेवटी हिंदी भाषेत गायलं आहे.



इंटरनेटवर लोकांकडून प्रचंड कौतुक


जगभरातील 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलेलं हे गाणं चांगलंच व्हायरल (Viral Song) झालं आहे. कोरियन कलाकारांचा हा व्हिडिओ लोकप्रिय तर झालाच, पण अनेकांना परदेशी कलाकारांचा हिंदीचा अतिशय स्पष्ट उच्चारही आकर्षित करत आहे. सामान्यतः परदेशी लोकांना हिंदी (Hindi) किंवा मराठीचा (Marathi) उच्चार बरोबर आणि स्पष्टपणे करता येत नाही. पण कोरियन गायिकेने (Korean Singer) हे गाणं भारतीय भाषेत देखील उत्तमरित्या गायलं आहे, त्यामुळे अनेक लोक या व्हिडिओचं खूप कौतुक करत आहेत.


हेही वाचा:


इकडे विमानाची वेळ झाली, तिकडे बायकोला स्टारबक्स कॉफीची तलफ झाली, नवऱ्याने बायकोला सोडलं, पण फ्लाईट नाही सोडली!