Manas National Park Rhino Viral Video : एक गेंडा (Rhino) पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. गुवाहाटी (Guwahati) येथील मानस राष्ट्रीय उद्यानातील (Manas National Park) हा व्हिडीओ (Viral Video) असल्याचा समोर आला आहे. सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचया वाहनामागे एक गेंडा धावत असल्याचा हा व्हि़डीओ आहे. अचानक गेंड्याने पाठलाग केल्याने पर्यटकांची चांगलेच घाबरले. दरम्यान, या घटनेमध्ये कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मानस नॅशनल पार्कमधील या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 29 डिसेंबर रोजी घडली आहे. ANI ने वन विभागाच्या माहितीवरून ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ANI ने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आसाममधील मानस नॅशनल पार्कमध्ये  एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.'


पाहा व्हायरल व्हिडीओ : पर्यटकांच्या वाहनाचा गेंड्याने केला पाठलाग






मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी सांगितले की, 'ही घटना 29 डिसेंबर रोजी आसाममधील मानस नॅशनल पार्कमध्ये घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.' तज्ज्ञांचे मते, जंगलात सततच्या मानवी हालचालींमुळे प्राणी अस्वस्थ झाल्यामुळे अशी घटना घडू शकते. गेल्या काही काळात मानस नॅशनल पार्क हे प्रमुख पर्यटकांचं प्रमुख बनलं आहे. यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.


मानस नॅशनल पार्क पर्यटकांचं आकर्षण


गुवाहाटी येथील मानस राष्ट्रीय उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या अभयारण्यात दुर्मिळ वन्य प्राणी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लोक जंगल सफारीला पसंती देत असल्याचं दिसत आहे. सध्या मानस नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची फार रेलचेल पाहायला मिळत आहे.