Viral Video : उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ येथील विधानसभा अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली आहे. अशा स्थितीत विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान (Vidhansabha Session) पक्ष आणि विरोधकांच्या सभागृहातल्या प्रयत्नांनंतर आता समाजवादी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केले असून, त्यात सत्ताधारी पक्ष भाजपच्या आमदारांचा एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचे एक आमदार तंबाखूचे सेवन करत होते तर दुसरे आमदार मोबाईलमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हि़डीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. 


पाहा व्हिडीओ : 






 


या संदर्भात "या लोकांनी विधानसभेला मनोरंजनाचे ठिकाण बनवलं आहे. भाजपचे आमदार सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावत आहेत. हे अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद असल्याचे समाजवादी पार्टीच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये महोबाचे भाजप आमदार राकेश गोस्वामी (MLA Rakesh Goswami) आणि झाशीचे भाजप आमदार रवी कुमार शर्मा ( MLA Ravi Kumar Sharma) खाली चोरून तंबाखू खाताना दिसत आहेत. 






खरंतर, ही घटना गेल्या 22 सप्टेंबरची आहे. मात्र, या व्हिडीओबाबत भाजपकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. दोन्ही व्हिडीओ शेअर करताना समाजवादी पार्टीने राज्यातील योगी सरकारलाही टोला लगावला आहे. दरम्यान, भाजपकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरेही नसल्याचा आरोप सपाने (समाजवादी पार्टी) केला आहे.  


महत्वाच्या बातम्या :