Trending News : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात. विशेषत: त्याच्या ट्विटरवरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांनी एक व्हिडीओ रिट्विट केला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे. व्हिडीओ रिट्विट करून त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही विनंती केली आहे. 

Continues below advertisement


 






आनंद महिंद्रांचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत 
आनंद महिंद्रांच्या या ट्विटबद्दल सविस्तर माहिती अशी की, 27 ऑगस्ट रोजी आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला एक सुंदर रस्ता असलेला व्हिडीओ त्यांनी रिट्विट केला. व्हिडीओ क्लिप रिट्विट करून, त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आणि आपणही असे करू शकतो का? हा प्रश्न केला. तसेच त्यांना देशातील नवीन ग्रामीण रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्याची विनंती केली.


आपणही असे करू शकतो का? आनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना प्रश्न


आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ रिट्विट करत लिहिले की, 'मला बोगदे आवडतात, पण मी अशा 'बोगद्या'मधून जाणे पसंत करेन. नितीन गडकरी जी, तुम्ही बांधत असलेल्या नवीन ग्रामीण रस्त्यांवर यापैकी काही बोगदे बसवण्याची योजना आखू शकतो का?'


व्हिडीओला 2 मिलीयन व्ह्यूज मिळाले


या व्यावसायिकाने 18 तासांपूर्वी त्याच्या आनंद महिंद्रा ट्विटर हँडलवरून 'ट्री टनेल'चा व्हिडिओ रिट्विट केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओला 36 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. तसेच 3800 यूजर्सनी व्हिडीओ रिट्विट केला आहे.


संबंधित बातम्या


Trending News : जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्गात मुख्याध्यापक नापास, मॅडम साधा भागाकारही करू शकल्या नाहीत, मग 'हे' घडले


Viral News : टार्गेट पूर्ण नाही झालं तर खावी लागतील कच्ची अंडी, 'या' कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळतेय अजब शिक्षा