Toddler eat  Grandfather Ashes: ब्रिटनमध्ये एका लहान मुलाने घरात ठेवलेल्या आजोबांच्या काही अस्थी खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. हा लहान मुलगा घरात खेळत होता तेव्हा आजोबांचा अस्थीकलश त्याच्या नजरेला पडला. लहान मुलांच्या सवयीप्रमाणे त्याने अस्थीकलश उघडून त्यामधील अस्थी खाल्ल्या. त्यानंतर अस्थीकलशातील राख घरात सर्वत्र पसरवून टाकली. या लहानग्याच्या आईने हा प्रकार पाहिला तेव्हा तिच्यावर डोक्यावर हात मारुन घेण्याची पाळी आली. माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाऊन टाकले, असे उद्गार तिच्या तोंडातून निघाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नताशा एमनी असे या महिलेचे नाव आहे. तिने घरातील काम करताना तिच्या लहान मुलाला एका खोलीत बसवले होते. मात्र, ही महिला परत आली तेव्हा तिचा मुलगा कोह हा राखेने माखला होता. यानंतर नताशाने खोलीत ठेवलेला तिच्या वडिलांचा अस्थीकलश पाहिला. चिमुरड्या कोहने हा अस्थीकलश उघडून त्यामधील अस्थी गिळल्या होत्या. त्यानंतर कोह काहीच घडले नाही अशा आविर्भावात खोलीत खेळत होता. हा सगळा प्रकार पाहून नताशाने म्हटले की, 'माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले'. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मी माझ्या वडिलांच्या अस्ती वरच्या कपाटात ठेवल्या होत्या. त्या कशा खाली आल्या? याचे मला आश्चर्य वाटते,' असे नताशा सांगते. मुलाच्या कृतीनंतर नताशाला चांगलाच धक्का बसला. 'पण जर माझे वडील इथे असते तर हे सर्व पाहून ते खूप हसले असते. माझे वडील माझ्या मुलाला कधीच पाहू शकले नाहीत. पण आता ते नेहमीच त्याच्यासोबत असतील, असेही नताशाने व्हिडीओत म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. 'तुमच्या मुलाने आजोबांना नाश्त्यात खाल्लं', 'तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता की तुझ्यात तुझ्या आजोबांचे गुण आहेत.' अशा मजेशीर कमेंट या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा

मुडदा बसवला त्या घिबली-गिबलीचा! स्वामी समर्थांना साईबाबा करुन टाकलं, 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल