Trending News : संपूर्णपणे हिंदू राष्ट्र म्हणता येईल असा कोणताही देश जगात नाही. पण, असे अनेक देश आहेत ज्यांच्या राष्ट्रीय प्रतीकांवर तुम्हाला हिंदू देव-दैवतांचे चिन्ह आणि मंदिर यांची चित्र दिसतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे अधिकृतपणे एकही हिंदू राहत नाही, पण तिथल्या राष्ट्रध्वजावर मात्र, एका मंदिराचं सुंदर चित्र आहे. हा देश नेमका कोणता? याचविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.


हा देश कोणता?


आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत तो कंबोडिया आहे. कंबोडिया हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याच्या ध्वजावर मंदिराचं चित्र आहे. खरंतर, या देशाच्या ध्वजात अनेक बदल करण्यात आले. परंतु त्यावर बांधलेले मंदिर कधीही बदलले नाही. सध्या या देशाचा राष्ट्रध्वज 1989 मध्ये बनवण्यात आला होता. या राष्ट्रध्वजाला 1993 मध्ये कंबोडिया सरकारने मान्यता दिली होती. पण या देशाच्या ध्वजावर मंदिराचं चित्र 1875 मध्येच बनवण्यात आले होते.


हे मंदिर कोणतं आहे?


आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते अंगकोर वाटचे मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकात महिधरपुराच्या राजांनी बांधले होते. हे एक प्रकारे अनोखं मंदिर आहे. ते बनवताना ज्या प्रकारची कारागिरी वापरली जाते ती अप्रतिम आहे. तु्म्ही ध्वजावरील झेंड्याकडे नीट पाहिल्यास या मंदिरात पाच मिनार असल्याचे लक्षात येईल. मात्र, ध्वजावर तीनच मिनार दाखवण्यात आले आहेत. या मंदिराची भव्यता इतकी आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या मंदिराची जगातील सर्वात मोठी धार्मिक वास्तू म्हणूनही नोंद केली आहे. भगवान विष्णूला समर्पित हे मंदिर मूलतः एक हिंदू मंदिर आहे जे राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी बांधले होते. मात्र, नंतर हळूहळू या मंदिराचे बौद्ध मंदिरात रूपांतर झाले आणि नंतर ते हिंदू-बौद्ध मंदिर म्हणूनही ओळखले जाऊ लागले.


या देशात कोणत्या धर्माचे लोक राहतात?


कंबोडियातील यूएस दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कंबोडियाच्या संस्कृती आणि धर्म मंत्रालयाच्या मते, या देशात 93 टक्के बौद्ध लोक आहेत. तर उर्वरित सात टक्के लोकांमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, अॅनिमिस्ट, बहाई, ज्यू आणि काओ दाई धर्म मानणारे लोक आहेत. म्हणजेच अधिकृतपणे पाहिले तर या देशाच्या आकडेवारीत हिंदूंचा उल्लेख नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त वीकेंडचा आनंद घेण्यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांची 'Sick Leave'; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल