Independence Day 2023 : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) जवळ आला आहे. अशातच सगळे सुट्टीसाठी प्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. कारण यावेळी सुदैवाने सुट्ट्या फ्री-फोकसमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सोमवारी सुट्टी मिळावी यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची धडपड सुरु आहे. जेणेकरून आपल्या मित्र-परिवाराबरोबर, कुटुंबीयांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करता येईल. यासाठी अनेकजणं आजारीही पडतायत. याचेच धम्माल आणि भन्नाट मीम्स सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. हे मीम्स (Memes) नेमके कोणते पाहा.

  










स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टी निमित्त लॉंग वीकेंडचा प्लॅन


आता लांबच्या सुट्ट्यांचा मुद्दा नेमका काय ते समजून घ्या. यावेळी सुदैवाने 12 आणि 13 ऑगस्टला शनिवार, रविवार आहे तर 15 ऑगस्टला मंगळवार आहे. अशातच 14 ऑगस्टला सोमवार आहे. अशा परिस्थितीत अनेकांची आठवड्याची सुट्टी शनिवार आणि रविवारी असल्याने त्यांना ही सुट्टी तशीच मिळाली. आता सोमवार 14 तारखेला आहे, फक्त या दिवसासाठी सुट्टी मिळावी म्हणून कर्मचाऱ्यांची अवस्था नेमकी कशी झालीय याचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारण जर तुम्हाला 12, 13, 14 आणि 15 ला सुट्टी मिळाली तर तुम्ही 4 दिवस मजा करू शकता हा या वीकेंड मागचा उद्देश आहे. 














हे लक्षात घेऊन अनेकांनी सुटीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. काही जणांनी 4 दिवसांची रजा केवळ सबब सांगून दिली. तसेच, मीम्समधील लोक 14 ऑगस्टला सुट्टी घेण्यासाठी विविध सबबी सुचवत आहेत. हे मजेशीर मीम्स (Memes) सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतायत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Cristiano Ronaldo: कोट्यवधींची कमाई, एका इन्स्टा पोस्टचे तब्बल 26 कोटी रुपये; विराट, मेस्सीला मागे टाकत इथेही ख्रिस्तियानो रोनाल्डोच अव्वल