Rolf Buchholz: जगभरात अनेक लोक त्यांच्या शरीरावर टॅटू, पिअरर्सिंग करतात. टॅटू  किंवा पिअर्सिंग करण्याचा छंद अनेकांना असतो. जर्मनीमधील रॉल्फ बुकोल्झ  (Rolf Buchholz) नावाच्या व्यक्तीनं देखील शरीरावर बरेच टॅटू काढले आहेत. त्यानं केलेलं  बॉडी मॉडिफिकेशन (Body Modification) पाहून अनेक लोक थक्क होतात. या व्यक्तीच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) करण्यात आली आहे. 


गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माहितीनुसार, रॉल्फ बुकोल्झ नावाच्या व्यक्तीनं शरीरावर 516 बॉडी मॉडिफिकेशन केले आहेत. रॉल्‍फला बॉडी मॉडिफिकेशन करण्याचा छंद आहे. रॉल्फनं सांगितलं की, 516 बॉडी मॉडिफिकेशन करुनही तो आता आणखी बॉडी मॉडिफिकेशन्स करणार आहेत. 


40 व्या वर्षी शरीरावर काढला पहिला टॅटू 
वयाच्या 40 व्या वर्षी रॉल्‍फला बॉडी मॉडिफिकेशनचा छंद लागला. त्यानं 40 व्या वर्षी शरीरावर पहिला टॅटू आणि पहिलं पिअर्सिंग केलं. आता रॉल्फ हा 60 वर्षांचा आहे. 20 वर्षांमध्ये रॉल्फनं त्याच्या शरीरावर  अनेक टॅटू काढले आहेत. तसेच पिरअर्सिंग देखील केलं आहे. चेहऱ्यापासून ते पायाच्या नखापर्यंत रॉल्फनं संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे टॅटू काढले आहेत.तो जर्मन टेलिकॉम कंपनीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. 


पाहा व्हिडीओ:



लूकमुळे दुबई विमानतळावर अडवलं 


रॉल्फ म्हणतो की बाहेरून त्याचे स्वरूप बदलले असेल, परंतु आतून तो अजूनही पूर्वीसारखाच आहे. त्याच्या 510 बॉडी मॉडिफिकेशन मध्ये 453 हे पिअर्सिंग, टॅटू आहेत आणि इतर बदलांचा समावेश आहे. हे सर्व केल्यानंतर रॉल्फ सामान्य माणसापेक्षा वेगळा दिसू लागल. यामुळे एकदा त्याला दुबई विमानतळावर अडवण्यात आलं होतं. तेथे त्याला एका कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा होता पण त्या कार्यक्रमामध्ये त्याला एन्ट्री देण्यात आली नाही.  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या युट्यूब चॅनलवर त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्सनं व्हिडीओला कमेंट करुन रॉल्फच्या लूकचं कौतुक केलं. तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे करताना त्याला किती वेदना झाल्या असतील?' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'हे करण्यासाठी त्यानं किती पैसे खर्च केले असतील? याचा मी विचार करत आहे.'


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Aliens on Earth : काय सांगता? डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन, टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्यानं सारेच हैराण