Trending Puzzle : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यापैकी काही फोटो मनाला सुखावणारे तर काही मन हेलावणारे असतात. काही फोटो पाहून तर धडकीच भरते. पण काही फोटो विचारात पाडतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक किडा शोधायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 30 सेकंदांचा वेळ आहे.
फक्त 30 सेकंदच... शोधून दाखवा फोटोतला किडा
जर तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहिला तर तुम्ही हे कोडं लगेच सोडवू शकता. फोटो पाहताच क्षणी तुमची नजर फोटोतील किडा शोधू लागते. पण त्यापूर्वी तुम्ही टायमर सेट करायला अजिबात विसरु नका. हे कोडं केवळ 30 सेकंदांत सोडवायला फार कमी लोकांना यश आलं आहे. तुम्ही जर नीट लक्ष देऊन आणि बारकाईनं पाहिलं तर तुम्ही नक्की हे कोडं सोडवू शकता.
फार कमी लोक सोडवू शकले हे कोडं
अनेक लोकांनी किडा शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण अनेकांना यात यश आलं नाही. आम्हीही हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हीही गोंधळलो होतो. फार कमी लोक कीडा शोधण्यात यशस्वी झाले आहेत. जर तुम्हाला अजुनही या फोटोतील किडा सापडला नसेल, तर मग चला आम्हीच तुम्हाला याचं उत्तर सांगतो. तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहा. या फोटोमध्ये तुम्हाला पानांवर एक झाडाच्या फांदीसारखी गोष्ट दिसेल. ती झाडाची फांदी किंवा लाकूड नसून तोच किडा आहे.
फोटोनं घातलाय इंटरनेटवर धुमाकूळ
सध्या हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) खरंच फार मजेशीर असतात. गोष्टी आपल्या समोर असतात. पण आपण त्या ओळखू शकत नाही. पण 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे का?
'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) म्हणजे 'दृश्य भ्रम'. साधारणतः एखादा मजकूर आपण घाईघाईत वाचण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखादी गोष्ट घाईघाईत शोधतो, तेव्हा ऑप्टिकल इल्यूजनचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. नेटकरीही या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात गुंतून जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :