Trending News : 'ऑप्टिकल इल्युजन' म्हणजे 'दृश्य भ्रम'. साधारणतः एखादा मजकूर आपण घाईघाईत वाचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ऑप्टिकल इल्यूजनचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा नेटकरी  याच ऑप्टिकल इल्युजनच्या जाळ्यात सापडले आहेत. एका व्हायरल होणाऱ्या फोटोवरुन नेटकऱ्यांमध्ये चढा-ओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये दडलेला नंबर शोधण्याचं आव्हान नेटकऱ्यांसमोर आहे. तसेच, याबाबत असा दावा केला जातोय की, फक्त 1 टक्के लोक या फोटोमध्ये दडलेला क्रमांक अचूक सांगू शकतात. 


दरम्यान, हा फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अचूक नंबर ओळखण्याच्या स्पर्धेत अनेकजण सहभागी होत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ब्लॅक अँड व्हाइट पट्ट्यांनी संपूर्ण फोटो तयार करण्यात आला आहे. यामध्ये 7 अंकी नंबर लपलेला आहे. कोणालाठीही एका नजरेत हा आकडा ओळखणं अत्यंत अवघड आहे. सोशल मीडिया यूजर्समध्ये या फोटोबाबत वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. फोटोमधील नंबर शोधण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु केवळ 1% लोकांनाच या फोटोत लपलेला नंबर दिसत आहे.



ट्विटरवर जणू या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये पूर आला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळे नंबर लिहित आहेत. कोणाला 45283 दिसतोय, तर कोणाला 5283 नंबर दिसतोय. पण प्रत्यक्षात मात्र फोटोमध्ये लपलेला नंबर 3452839 हा आहे. कमेंट सेक्शनमध्ये केवळ 1% लोकांनीच हा नंबर बरोबर ओळखला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Exam: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha