Viral News: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... असं मंगेश पाडगावकर यांनी म्हटलं आहे. प्रेमात रुसवे-फुगवे नेहमीचेच. मग तो रुसवा घालवण्यासाठी प्रियकर वा प्रेयसीला नाना प्रकारे प्रयत्न करावे लागतात. असंच एका रुसलेल्या प्रियकराचं मन वळवताना प्रेयसीने पत्र लिहिलंय. त्यामध्ये ती प्रियकराला जानू, मुन्ना, राजा, टोमॅटो, कबूतर आणि रसगुल्ला अशा एक ना अनेक उपमा देताना दिसत आहे. 


प्रेम आणि प्रेमाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.यापैकी काहीजण आपले प्रेम अशा प्रकारे व्यक्त करताना दिसतात, जणू जन्मापासून ते एकमेकांवर प्रेम करत आहेत. नुकतंच असंच एक प्रेमपत्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जे पाहिल्यानंतर एकाच वेळी तुम्हाला प्रेमाच्या भावना दाटून येतील आणि काहीसं हसूही येईल.हे व्हायरल होत असलेले हे पत्र वाचून अंदाज लावला जाऊ शकतो की प्रियकराचा त्याच्या प्रेयसीवर एखाद्या गोष्टीवरुन राग आहे. मग त्या प्रियकराची नाराजी दूर करण्यासाठी प्रेयसीने एक चिठ्ठी लिहिली असून, त्यामध्ये प्रेयसी प्रियकराचे मन वळवण्यासाठी जानू, मुन्ना, राजा, टोमॅटो, कबुतर, रसगुल्ला असे शब्द वापरत आहे.


इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या पत्रात काय लिहिले आहे ते वाचून तुम्हालाही हसू येईल. हे पत्र हिंदीत लिहिलं असून त्यामध्ये ती प्रेयसी लिहितेय की, ''डार्लिंग, मला तुझ्यावर शंका नाही पण मला एक मुलगी तुझ्याशी बोलताना दिसते.  एखाद्या मुलीला तुझ्यासोबत बोलताना पाहिलं की मला वेदना होतात, अस्वस्थता वाढते. तू कोणत्याही मुलीशी बोलत जाऊ नकोस, तिच्यासोबत बोलताना हसत जाऊ नकोस. मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करते, त्यामुळे हे मी तुला सांगतेय. तू कुणाच्याही घरी जात जाऊ नकोस, मग ती मुलगी असो वा आणखी कोणी. तू माझा कबुतर आहेस, मी जर काही चुकीचं लिहिलं असेल तर माफ कर. आय लव्ह यू...आय लव्ह यू...आय लव्ह यू. सॉरी मुन्ना... मी जर काही चुकीचं लिहिलं असेल तर... माझा कबुतर, जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला... आय मिस यू."


 




प्रेमाने भरलेले हे पत्र वाचून यूजर्सही हैराण झाले आहेत. हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर theadulthumour नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हे पत्र आतापर्यंत अनेकांनी वाचलं आहे. या पत्रावर सोशल मीडियावर हजारो लाईक्स आल्या आहेत, तसेच अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. पोस्ट पाहणारे यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी तुझ्या जागी असतो तर या मैत्रिणीसाठी जीव द्यायला तयार झालो असतो.' दुसर्‍या यूजरने लिहिले, 'अरे भाऊ! एक गोष्ट सांगतो की अशी जिवापाड प्रेम करणारी गर्लफ्रेन्ड आजच्या जगात क्वचितच पाहायला मिळते.