Killer Song: अनेक वेळा आपण अशा काही गोष्टींबद्दल ऐकतो, ज्या पाहिल्यावर किंव ऐकल्यावर आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आज अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेऊया. जगात एक असं गाणं (Song) आहे, जे गायल्यस स्टेजवर गाणाऱ्याचा गायकाचा मृत्यू होतो. या एका गाण्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यामुळेच हे गाणं 'किलर साँग' म्हणून ओळखलं जातं. गाणं गायल्यामुळे मृत्यू नेमका का होतो? आणि ते गाणं नेमकं कोणतं आहे? आतापर्यंत किती लोकांचा या गाण्यामुळे मृत्यू झाला आहे? या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...


गाण्याबद्दल काय आहे दावा?


इंग्रजी वेबसाईट डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे गाणं दक्षिण पूर्व आशियाई देश असलेल्या फिलिपाईन्सचं (Philippines) आहे. हे गाणं जगातील सर्वात धोकादायक गाणं म्हणून ओळखलं जातं आणि या गाण्याचं नाव आहे - माय वे (My Way Song). या गाण्याला फिलिपाईन्सचे 'किलिंग साँग' म्हणतात.


लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवर हे गाणं गाणाऱ्या 12 गायकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हे गाणं गाणारा प्रत्येक व्यक्ती मृत्यूला बळी ठरतो, असा दावा केला जातो. असं असूनही फिलिपाईन्समध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र तिथे राहणारे लोक आजही या गाण्याची भीती बाळगून आहेत. हे गाणं गुणगुणण्याआधीच लोक घाबरतात. या गाण्यावर सध्या काही बारमध्ये देखील बंदी आहे.


हे गाणं गायल्यामुळे मृत्यू का होतो?


90 च्या दशकात हे गाणं गाणाऱ्या गायकाची हत्या केली जायची. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत एका पॉडकास्टरने म्हटलं होतं की, हे गाणं सामान्य नागरिकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करतं. गाणं ऐकण्यासाठी अनेक जण शस्त्रं घेऊनही जातात. हे गाणं ऐकणारा गाणं ऐकून इतका उत्तेजित होतो की तो हिंसा करू लागतो. अनेकवेळा तो दारूच्या नशेत असतो आणि त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीलाही मारतो.


या गाण्याच्या ओळी गाणं ऐकणाऱ्यांमध्ये राग जागृत करतात, या रागात गाणं ऐकणारा काय करतो याचं त्याला स्वत:ला भान राहत नाही. या गाण्याच्या ओळींमध्ये हिंसा आहे, जी एखाद्या व्यक्तीला खुनासाठी प्रवृत्त करते. यामुळेच आतापर्यंत 12 गायकांचा गाण्याच्या कार्यक्रमादरम्यानच मृत्यू झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rabies : फक्त कुत्राच नाही तर 'या' प्राण्यांच्या चावण्यानेही रेबीजचा वाढतो धोका; मांजरचाही यात समावेश