Israel Hamas War: इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. हा मृतांचा आकडा 4 हजारांच्या पुढे गेला आहे. यावेळी इस्रायल (Israel) हमासला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी संपूर्ण पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ले केले जात आहेत. गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीवर लाखो किलो गनपावडरचा मारा केला गेला आहे. दरम्यान, आता हमास (Hamas) ही अतिरेकी संघटना नेमकी कोण चालवतं आणि त्याचे मोस्ट वॉन्टेड चेहरे कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया.


हमास म्हणजे काय?


तर हमास ही पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना आहे, जी गाझा पट्टीवर पूर्णपणे राज्य करते. ते तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये लपून त्यांची संपूर्ण फौज तयार करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं असतात, ज्याद्वारे ते प्रत्येक वेळी इस्रायलला लक्ष्य करतात. अशा हल्ल्यांसाठी इराण (Iran) हमासला उघडपणे मदत करतो, असं मानलं जातं. या युद्धात इराणनेही इस्रायलला आव्हान दिलं आहे.


हमासचे टॉप कमांडर आणि नेते कोण?


हमासमध्ये वेगवेगळे विंग तयार झाले आहेत, त्यातील सर्वात धोकादायक मिलिट्री विंग आहे, ज्याला अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. मोहम्मद दीब अल-मसरी यांचंही एक नाव हमासच्या लष्करी कमांडरच्या यादीत टॉपला आहे, ज्याला अबू खालिद या नावानेही ओळखलं जातं. अबू खालिद हा हमासची लष्करी संघटना आयजे अल-दिन अल-कासम ब्रिगेडचा प्रमुख आहे. इस्रायली या खतरनाक कमांडरला मॅन ऑफ डेथ म्हणतात.


हमासचं दुसरं सर्वात मोठं नाव म्हणजे - मारवान इसा, जो सर्वोच्च कमांडर्सपैकी एक आहे. तो आयजे अल-दिन अल-कासम ब्रिगेडचा डेप्युटी कमांडर आहे. मारवान पाच वर्षांपासून इस्रायलच्या कैदेत आहे. इस्रायलवर हल्ले करण्यात आघाडीवर असलेला हमासचा तो अत्यंत धोकादायक कमांडर मानला जातो.


हमासच्या सर्वोच्च कमांडरपैकी तिसरं नाव याह्या सिनवार आहे, जो त्याच्या राजकीय ब्युरोची देखरेख करतो. सिनवारचं नाव अमेरिकेच्या काळ्या यादीत समाविष्ट आहे. सिनवार हा हमासच्या सुरक्षा सेवेचा प्रमुख माजद देखील आहे. तो हमासची सर्व रणनीती बनवण्याचं काम करतो. हे तिघेजण मिळून हमासची सर्व मुख्य सूत्र सांभाळतात आणि हल्ल्यांची योजना आखतात.


हेही वाचा:


Israel: कोण होते इस्रायल? ज्यांच्या नावाने ज्यू लोकांनी वसवला स्वतंत्र देश