पाटणा : देशभरात महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरण गाजल्यानंतर युपीएससी स्पर्धा परीक्षेतील काही घोटाळे आणि बोगस प्रमाणाचे विषय समोर आले. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांचं आयएएस पदही रद्द करण्यात आलं आहे. युपीएससीच्या (UPSC) या निर्णयाचं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागतही केलंय. युपीएससी स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि वरिष्ठ पद मिळवून देणारी परीक्ष आहे. त्यामुळे, युपीएससी परीक्षेत (Exam) उत्तीर्ण होऊन करिअर करण्यासाठी लाखो, करोडो तरुणाई रात्रीचा दिवस करुन काम करते. मात्र, युपीएससी परीक्षेतून आयपीएस पदाला गवसणी घालणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अवघ्या 5 वर्षातच आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा आयपीएस रँक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. 


बिहारच्या दरभंगा येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस काम्या मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारीच त्यांनी आपल्या राजीनामाच्या पत्र पोलीस मुख्यालयास पाठवले आहे. स्वत: काम्या मिश्रा यांनीच याबाबत माहिती दिली असून व्यक्तिगत व घरगुती कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, अद्याप मुख्यालयाकडून त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. मी आई-वडिलांची एकुलती एक लेक आहे, आमचा मोठा उद्योग-व्यापार आहे, सध्या तोच सांभाळायचा आहे. त्यामुळेच, मी नोकरी सोडतेय, नाहीतर एवढी चांगली नोकरी कोण सोडेल, असे काव्या मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काव्य मिश्रा यांनी वयच्या 22 व्या वर्षीच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. या परीक्षेच्या रँकींगमधून त्यांना आयपीएसपदी संधी मिळली. सन 2019 साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली होती. त्यानंतर, त्यांना सर्वप्रथम हिमाचल कॅडरमध्ये नेमणूक देण्यात आली. 2021 मध्ये त्यांची बदली बिहार कॅडरमध्ये करण्यात आली होती. काव्या यांचे पती अवधेश दीक्षित हेही 2021 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते मुजफ्फरनगर शहर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. 


दरम्यान, काव्या मिश्रा यांनी 4 वर्षांच्या कार्यकाळात पोलीस खात्यात स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. लेडी सिंघम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात, विशेष म्हणजे दरभंगा जिल्ह्यातील पहिल्या महिला ग्रामीण एसपी म्हणून त्यांना संधी मिळाली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी प्राप्त केल्यानंतर युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. नोकरीत मन लागत नाही, असे म्हणत त्यांच्याकडून सातत्याने राजीनामा देण्याचे संकेत दिले जात होते. अखेर, सोमवारी त्यांनी आपला राजीनामा दिला. 


हेही वाचा


बाळा मी इथेच आहे; पुस्तक प्रकाशनावेळी आईचा आवाज ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात पाणी