Half Wheel Bicycle Video : सध्या आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानामुळे (Technology) माणूस अगदी अंतराळात पोहोचला आहे. विज्ञान (Science) आणि तंत्रज्ञानाच्या आधारे मानव चंद्रावर आणि मंगळावरही संशोधन करत आहे. शास्त्रज्ञ दररोज नवनवीन शोध लावत आहेत. अशात कधी अशा नवीन अनोख्या शोधांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत आहे. याच कारण म्हणजे सायकल (Cycle) अर्ध्या चाकावर चालते. हो तुम्ही वाचताय ते योग्य आहे, ही भन्नाट सायकल चक्क अर्ध्या चाकावर चालते. 


अर्ध्या चाकावर चालणारी सायकल हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण हेच खरं आहे. आम्ही असं का म्हणतोय ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही आधी विश्वास बसणार नाही. या अनोख्या सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही सायकल अर्ध्या चाकावर चालते. या सायकलला साधारण सायकलप्रमाणे हँडल, सीट आणि पुढचा टायर आहे. पण या सायकलला मागे दोन अर्धे टायर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही अर्ध्या टायर असलेली सायकल साधारण सायकलप्रमाणेच चालते. अशी सायकल बनवण्याचा कुणी विचारही केला नसेल




इंजिनियरची भन्नाट शक्कल
एका इंजिनियरने भन्नाट शक्कल लढवत ही अनोखी सायकल बनवली आहे. ही सायकल पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. नेटकरी या इंजिनियरची प्रशंसा करताना थकत नाही आहेत.


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या अर्ध्या चाकावर चालणाऱ्या सायकलचा व्हिडीओ theq_original नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ही सायकल पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर आणि लाईक करत आहेत.


संबंधित इतर बातम्या