Future Homes Video Viral : आजचे युग हे विज्ञानाचे (Science) युग आहे. विज्ञानाने आपल्याला खूप काही दिले आहे. यामुळे असे शोध लागले आहेत, जे चमत्कारापेक्षा कमी नाहीत. ही विज्ञानाची देणगी आहे, ज्यामुळे आज मंगळावर माणूस पोहोचला आहे. भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेत माणूस काही तासांतच पोहोचू शकतो हा विज्ञानाचा चमत्कार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे, जो भविष्यात घरे (Future Homes) कशी असतील? हे दर्शवित आहे. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.


 


 






 


लोक मेट्रोतून थेट आपापल्या घरी उतरतील...
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला सोफ्यावर बसून मोबाईल खेळत आहे, त्याचवेळी तिच्या घराच्या जमिनीतून काही भाग बाजूला होतो आणि खालून मेट्रो ट्रेन येताना दिसते. घराखालून धावणारी मेट्रो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण त्याहीपेक्षा तुम्हाला ही गोष्ट पाहून आश्चर्य वाटेल, जेव्हा तुम्हाला मेट्रोतून एक डब्बा चक्क वर येतो आणि त्याच डब्यातून मुलगा बाहेर पडताना, तसेच थेट घरापर्यंत येताना दिसतो. याचाच अर्थ, मेट्रोने या मुलाला थेट घरी सोडले आहे. आतापर्यंत मेट्रो पकडण्यासाठी स्टेशनवर जावं लागायचं, पण हा व्हिडिओ पाहून असं वाटतंय की, येत्या काळात लोक मेट्रोतून थेट आपापल्या घरी उतरतील. हे पाहणे जितके मनोरंजक आहे. तितकेच ते रोमांचक आहे.


भविष्यातील घर कसे असेल?


व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या घराची रचना जरी ग्राफिक पद्धतीने केली गेली असली, तरी लोक ज्या पद्धतीने विचार करत आहेत, त्यामुळे भविष्यात असे काही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, चीनमध्ये एक रेल्वे ट्रॅक असा देखील आहे, जो निवासी इमारतीतून जातो. हा ट्रॅक चोंगकिंगमधील एका इमारतीतून जातो, ज्याला माउंट सिटी असेही म्हणतात.


अप्रतिम व्हिडीओ शेअर
ट्विटरवर @TansuYegen या हँडलवरून हा अप्रतिम व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 12 सेकंदांच्या या क्लिपमुळे इंटरनेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडीओ जवळपास 50 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 43 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे.


इतर बातम्या


Sentinel Tribe: 'हे' जगातील सर्वात रहस्यमय लोक! बाहेरील जगाशी संपर्क ठेवत नाहीत, जाणून घ्या