मुंबई : आईस्क्रीममध्ये (Ice Cream) माणसाचं बोट सापडल्यानंतर (Human Finger) आता आईस्क्रीममध्ये गोम  (Centipede) सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच्या मुंबईध्ये आईस्क्रीम कोनमध्ये माणसाचं बोट सापडल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता आणखी एक बातमी समोर आली आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या  डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आता आईस्क्रीममध्ये सापडली गोम


मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं बोट सापडल्यानंतर आता नोएडामध्ये आइस्क्रीमच्या डब्यात गोम सापडल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपाने शनिवारी सकाळी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटवरून अमूलचे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केला होता. या महिलेने दावा केला आहे की, तिने अमूल आईस्क्रीमचा डबा (Amul Ice Cream) उघडला तेव्हा त्यात एक गोम होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


महिलेचा अमूल कंपनीवर मोठा आरोप


नोएडातील सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपाने शनिवारी सकाळी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटवरून अमूलचे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केले होते. महिलेने आरोप केला आहे की, तिने अमूल आईस्क्रीमचा डबा उघडला तेव्हा आतमध्ये एक गोम सापडली. या घटनेमुळे महिलेसह संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसल्याचंही महिलेने सांगितलं आहे. दरम्यान, महिलेच्या खळबळजनक दाव्यामुळे नागरिक आता अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 


पाहा व्हायरल व्हिडीओ : VIRAL VIDEO 






कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवावा?


अमूल ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे आणि तिची उत्पादने देशभर वापरली जातात. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांसाठी अमूल एक विश्वासार्ह ब्रँड आहे. पण नोएडातील या घटनेने लोकांच्या मनात गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर, अमूलसारखी मोठी कंपनीही आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसेल, तर कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. तर, काही नेटकऱ्यांनी याला केवळ एक दुर्दैवी घटना म्हटलं असून आणि त्यांचा अमूलवरील विश्वास कायम असल्याचं सांगत आहेत. दरम्यान, या व्हिडीओची पुष्टी एबीपी माझा करत नाही. अमूल कंपनीने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.