Himachal Viral Video : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) येथे ढगफुटीमुळे (Cloud Burst) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. आता हिमाचल येथील असाच एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओही आता समोर येत आहे. हिमाचलच्या कुल्लू (Kullu) येथे ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानात एक संपूर्ण दुकान क्षणार्धात वाहून गेल्याचं संबधित व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानतर तुम्ही अगदी दचकून जाऊ शकता. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओने सर्वांना भंडावून सोडलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थाने (ANI) हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना हिमाचल प्रदेश येथील कुल्लूच्या आनी ब्लॉक (Anni block of Kullu) येथील आहे. 'कुल्लूच्या आनी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला आणि दुकानाचा ढाचाच वाहून गेला. एका बस स्टँडजवळील हे दृश्य.'
व्हायरल होत आहे VIDEO
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वाहत्या नाल्यासोबत रस्त्याचा एक मोठा भाग अगदी विचित्रपणे कोसळताना दिसत आहे. एक संपूर्ण दुकान देखील यावेळी थेट खाली दरीत कोसळत असल्याचं दिसत आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ सर्वाधिक व्हायर होत आहे. 11 ऑगस्ट रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ बातमी लिहिपर्यंत आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यूजर्स व्हिडिओला सतत रि-ट्विट करत कमेंट्सही करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान
हिमाचल प्रदेश येथील चंबामध्ये ढगफुटी आणि भरमौर भागात संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी मोठं नुकसान होत असून कुल्लू जिल्ह्यात भूस्खलनात दोन महिला ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याची घटना देखील समोर आली आहे. तसंच अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे अनेक दुकाने आणि वाहने वाहून गेली आणि महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हे देखील वाचा-