Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एखाद्या डोंगराळ भागातील असल्याचे दिसून येते. वळणदार रस्त्यांवर एक पल्सर बाईकस्वार भरधाव वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या पुढे एक स्कॉर्पिओ गाडी असते आणि दोन्ही वाहने डोंगराच्या वळणांवरून पुढे जात असताना बाईकस्वार स्कॉर्पिओला ओव्हरटेक करण्यासाठी सातत्याने बाईकचा वेग वाढवत असतो. मात्र त्यानंतर जे काही घडते, ते निश्चितच तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल.

ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, बाईकस्वार अनेक वेळा स्कॉर्पिओच्या अगदी जवळ येतो, पण रस्ता अरुंद असल्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही. त्याच्या बाईकवर कॅमेरा सुरू असतो आणि तो सतत अशी संधी शोधत असतो की जिथे फक्त एक फूटसुद्धा जागा मिळेल, तिथून तो स्कॉर्पिओला ओव्हरटेक करू शकेल. थोड्याच वेळात त्याला थोडीशी साइड मिळते, आणि तो पल्सरचा वेग वाढवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याच क्षणी स्कॉर्पिओ चालक कोणताही इंडिकेटर न देता अचानक गाडी उजवीकडे वळवतो. यामुळे स्कॉर्पिओचा मागचा भाग थेट बाईकला धडकतो. त्यानंतर जे घडतं, ते अत्यंत भयावह आहे.

कारला धडकून रस्त्यावर पडला बाईकस्वार

धडक लागल्यानंतर बाईकस्वार थेट रस्त्यावर कोसळतो. त्याची बाईक दूर जाऊन पडते आणि कॅमेराचा लेन्स तुटल्याचा आवाज येतो, त्यासह व्हिडिओ अचानक बंद होतो. त्यानंतर नेमकं काय घडलं, हे व्हिडिओत दिसत नाही, मात्र जे काही दिसलं, त्यानेच पाहणाऱ्यांचे अंगावर काटा आणला आहे. हा व्हिडिओ केवळ एका अपघाताचा नाही, तर एक मोठा धडा आहे की, डोंगराळ भागातील रस्त्यांवर वेग आणि घाई दोन्हीही जीवघेणे ठरू शकतात. ओव्हरटेक करण्याचा अट्टाहास कधी-कधी अशी किंमत वसूल करतो, जी माणसाला आयुष्यभर चुकवता येत नाही. किंवा कधी कधी आयुष्यच शिल्लक राहत नाही.

यूजर्सच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ @Deadlykalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, अनेकांनी तो लाईकही केला आहे. व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने लिहिलं, "पास करण्यासाठी भरपूर जागा होती, चूक कार चालकाचीच वाटते." तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, "अशा रस्त्यांवर बाईकस्वार छपरी लोकांना बंदी घालायला हवी." तिसऱ्या एका यूजरने म्हटलं, "चूक बाईकस्वाराचीही आहे, हिरो बनण्याची गरज नव्हती," अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत. 

आणखी वाचा 

Gadchiroli Accident News: रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना