नाशिक : नाशिकमधील किरकोळ बाजारात भाज्यांनी ऐंशी पार केली आहे. तर कोथिंबीर, कांद्यानंतर आता टोमॅटोने विक्रमी भावाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांची खरी दिवाळी साजरी होतांना दिसते आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या ठोक बाजारात टोमॅटो 50 रुपये किलोवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षात टोमॅटोला पहिल्यांदा इतके ‘अच्छे दिन’ आले आहेत. तर कांदा 40 रुपये किलो तर कोथंबीर 150 रुपये जुडी झाली आहे.

याशिवाय इतरही भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. तर किरकोळ बाजारात इतर भाज्याचे भाव 80 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.