मुंबईला वादळाचा धोका नाही, व्हॉट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेवू नका: बीएमसी
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2017 02:33 PM (IST)
मुंबईत दुपारनंतर फियान वादळ धडकणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत. मात्र हवामान विभागाकडून असा कोणताही इशारा दिला नाही
मुंबई: मुंबईत वादळ येणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र अशा कोणत्याही वादळाचा धोका नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी केलं. मुंबईत दुपारनंतर फियान वादळ धडकणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत. मात्र हवामान विभागाकडून असा कोणताही इशारा दिला नाही, असं सुधीर नाईक यांनी सांगितलं. वादळामुळे वांद्रे-वरळी सीलिंक, पेडर रोड बंद करण्यात आला आहे, सायन ब्रिज बंद झाला असून, वाहने माघारी पाठवत असल्याचे मेसेजही फॉरवर्ड होत आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. https://twitter.com/DisasterMgmtMum/status/910401424969785344 पुन्हा पावसाला सुरुवात दरम्यान, मुंबईत टाईम प्लीज घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्याला काल दुपारपासून झोडपणाऱ्या पावसाने आज सकाळीही दमदार बॅटिंग केली. सकाळी नऊनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु दुपारी साडेबारानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. संबंधित बातम्या