नागपूरः जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या हजारापार पोहोचली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 188 नव्या बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 125 ते ग्रामीणमधील 63 जणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्याती  सक्रिय बाधितसंख्या 1013 पर्यंत पोहोचली आहे. परिणामी आता प्रशासनाच्यावतीने निर्बंध लावण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


शुक्रवारी ग्रामीणमधून 34 तर शहरातील 108 जणांना कोरोनावर मात केली. सध्या नागपूर शहरात 711 तर ग्रामीणमध्ये 302 रुग्ण आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 1598 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1259 चाचण्या शहरात तर 339 चाचण्या ग्रामीणमध्ये करण्यात आल्या. यासोबतच दिवसभरात 412 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या.


सध्या 24 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील 4 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, 1 बाधित मेयो मध्ये, 5 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे, गंगा केअर हॉस्पिटलमध्ये 2 बाधित, सेंट्रल एव्हेन्यू हॉस्पिटलमध्ये 1, शुअरटेक हॉस्पिटल, धंतोली येथे 1 आणि मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये पाच बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 989 बाधित गृहविलगीकरणात आहेत.


लसीचा 'प्रिकॉशनरी डोस' घेण्याचे आवाहन


नागपूर : कोविड-19 लसीकरणाचा आझादी का अमृत महोत्सव दिनांक 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) पर्यंत सर्व शासकीय आरोग्य संस्थेत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत कोविड-19 लसीकरण आझादी अमृत महोत्सवा दरम्यान 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रिकॉशनरी डोस हा मोफत देण्यात येणार आहे.
कोविड-19 लसीकरण दुसरा डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पुर्ण झालेल्या 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना प्रिकॉशनरी डोस हा मोफत देण्यात येत आहेत. तरी दिनांक 15 जुलै 2022 पासुन 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) पर्यंत सर्व शासकीय संस्थांमध्ये 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जाऊन प्रिकॉशनरी डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केली आहे.