नागपूरः  ब्रॉंडिंग नसलेले अन्न धान्याचा उपयोग मध्यमवर्गीय आणि गोरगरींबांकडून होत असतो. मात्र केंद्र सरकारच्या नव्या अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी (GST) लावण्याच्या निर्णयामुळे या गोष्टी महागणार आहेत. आधीच जनता महागाईने त्रस्त असताना या निर्णयामुळे गोरगरीबांचे जगणेही कठीण होणार आहे. या सरकारच्या धोरणाविरोधात देशभरात व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा सांकेतिक संप पुकारला असून नागपूरातील (Nagpur) 3 हजारावर व्यापारी यात सहभागी झाले असून त्यांनी दिवसभर दुकान बंद ठेवत निषेध नोंदविला. या संपात दालमिल, राईसमिल, अन्नधान्य विक्रेते आणि आईल व्यापाऱ्यांसह आदींचा सहभाग आहे.


18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड (Non Branded) अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. एकतर शेतकऱ्याला आपल्या मालाचे दर कमी मिळणार किंवा हे दर खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या खिश्यातून वलूस करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने त्वरित याची दखल घेत निर्णय मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी केली आहे. शहरातील व्यापाराची चाके थांबल्याने दिवसभरात कोट्यावधींचे व्यापार ठप्प झाले आहे.


केंद्र सरकारने (Central Government) जीएसटी अंमलात आणण्यापूर्वी ज्या वस्तुंतर एक्साईज किंवा वॅट लागत नाही अशा उत्पादनांना जीएसटीमधून सुट राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनी निर्णय फिरवला आहे. परिणामी मध्यमवर्गीय आणि गोरगरीबांना याची भरपाई करावी लागणार असल्याने सरकारने आपल्या शब्दांवर ठाम राहून हा निर्णय मागे घ्यावा असेही यावेळी दिपेन अग्रवाल यांनी सांगितले.


अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांनी (Traders Union) एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. 18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर आज परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थितीबाबत


18 जुलैपासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का


18 जुलै 2022 पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार असून त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलने सामान्य माणसांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वस्तूंसाठी उपलब्ध जीएसटी सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही वस्तू अशा आहे ज्यांवर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय 18 जुलैपासून लागू होणार आहेत.


या वस्तूंवर जीएसटी भरावा लागेल


डब्यात किंवा पॅक केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. बँकेकडून टेट्रा पॅक आणि चेक जारी करण्याच्या सेवेवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. अॅटलससह नकाशे आणि तक्त्यांवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय लागू होणार आहे.


मागणीनुसार बदलतात दर


दाल, राईस आणि धान्याचे दर मागणी आणि पुवठ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे हे दर सतत बदलत असतात. मात्र यावर अधिक जीएसटीचा बोझा लादतल्यास 8-10 टक्के दर वाढणार असल्याचे अंदाज आहे. याचा थेट फटका ग्राहकाला बसणार असून शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचे कमी दर मिळणार हे निश्चितच.


GST : केंद्र सरकारच्या GST विरोधात सर्व बाजार समित्या बंद, जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थिती