Vidya Chavan: महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा एवढा बोजवारा वाजलेला कधी बघितले नाही. महागाई बेरोजगारी वाढली आहे याचे उत्तर त्यांच्याकडे नाही महाराष्ट्रतले प्रकल्प गुजरात मध्ये गेलेत. तर दुसरीकडे  शिंदे आणि फडणवीस हे दोघे दिल्लीचे मुजरेकरी झालेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा मुलगा या मतदारसंघाचा खासदार आहेत शिंदे अनेक वर्षापासून मंत्री आहेत. मात्र या मतदारसंघात रस्त्यांची दुरावस्था आहे.. हे सगळं भयंकर आहे लोकांनी आपलं लक्ष फक्त आणि फक्त मूलभूत सुविधा कशा मिळतील महागाई कशी कमी होईल बेरोजगारी कशी कमी होईल याकडे दिला पाहिजे आम्ही देखील ही जनजागरण यात्रा यासाठीच काढतोय असे सांगितले. विद्या चव्हाण आज कल्याण डोंबिवली मध्ये राष्ट्रवादीच्या जनजागणी यात्रे निमित्त आल्या होत्या. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


सेंसर बोर्ड आहे च्या माध्यमातून मोदीनी फिल्म प्रोडूसर डायरेक्टर ना पत्र पाठवावेत - विद्या चव्हाण यांचा सावध पवित्रा
राज्यात सद्या भाजप नेत्या चित्रा वाघ व उर्फी जावेद या दोघांमध्ये सुरू असलेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे .याबाबत बोलताना विद्या चव्हाण यांनी सावध पवित्रा घेतला याबाबत बोलताना हा वाद निरर्थक आहे... मला कोणत्याच वादावर बोलायचं नाही लोकांना महागाई व बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे विषय आहेत.. त्या विषयावर मी काही बोलणार नाही ...सेंसर बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून मोदीनी फिल्म प्रोडूसर डायरेक्टर ना पत्र पाठवावेत महिलांना चांगले कपडे घालण्यास लावावे ,अश्लील भाषा वापरू नका असे सांगावे .. हे संस्कार मुलींवर एका दिवसात होत नाही.. हे संस्कार मुलींवर हिंदी मराठी सिनेमांमधून येतात ...हे जे काही चाललंय तेव्हा मोदींनी सेन्सर बोर्ड आणावे प्रत्येकाला पत्र लिहा व महिलांना अंगभर कपडे दाखवा.. मुली बघतात तेच आपण आचरणात आणतो.. त्यामुळे मुलींना काही दोष देत नाहीत ..अनेक चांगले मुली आहेत  ... एखाद दुसरे असं कोण असेल तर त्याला इतकं बोलायचं ? असं सांगत कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा सवाल केलं


एकनाथ शिंदे जादूटोणा करण्यासाठी कामाख्या देवीला जातात - विद्या चव्हाण


विद्या चव्हाण यांनी यावेळी बोलताना शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. '५० खोके, एकदम ओके', असं म्हणत एकनाथ शिंदे हे कामाख्या देवीला का जातात? असा प्रश्न त्यांनी विचारला. 'तुम्ही तुळजाभवानीला जा, सप्तशृंगीला, जा अंबाबाईला जा.. कामाख्या देवीला का जाता? कारण तिथे जंतर-मंतर आणि जादूटोणा केला जातो',  असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.


राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांसाठी काढलेल्या या जागरण यात्रेत आज कल्याण शहरात विविध भागात विद्या चव्हाण यांनी महिलांशी संवाद साधला. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यादेखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी कार्यालयात आल्यानंतर भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतरही चव्हाण या भगवी शाल पांघरूनच बसल्या होत्या. हे लक्षात येताच एक महिला कार्यकर्त्या चव्हाण यांच्या अंगावरची शाल काढण्यासाठी आल्या असता चव्हाण यांनी त्यांना थांबवत 'राहू दे, मी मुद्दाम ही शाल अंगावर घेऊन बसली आहे. भगवा रंग हा आमचा सुद्धा आहे. कोणी त्यावर स्टॅम्प मारलेला नाही!' असं म्हणाल्या. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.



आरोप सिद्ध करा अन्यथा...एक रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा - मनसेचा विद्या चव्हाण यांना इशारा


संदीप माळी हा भाजपचा पदाधिकारी 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो तो कसा सुटू शकतो ?  त्याला जामीन कसा मिळू शकतो? असा सवाल करत  त्याला वाचवणारे दोन आमदार एक रवींद्र चव्हाण आणि दुसरे मनसेचे आमदार राजू पाटील असल्याचा आरोप केला .पुढे बोलताना एका केबल ऑपरेटर ने  या माळीच्या दहशतीपोटी आत्महत्या केली त्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले.. रवींद्र चव्हाण रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना दबाव टाकत होते.. जर माळींवर एफ आय वर जास्त सेक्शन लागले तर त्यांना सोडवणे फडणवीसंना कठीण जाईल म्हणून रवींद्र चव्हाण अडीच तास ते ऑफिसमध्ये बसून होते असा गौपयस्फोट विद्या चव्हाण यांनी केला . पुढे बोलताना चव्हाण यांनी तुम्ही अशा माणसांना मिनिस्टर करता गुन्हेगारांना वाचवता आणि तेही लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या माणूस सुटू कसा शकतो असा संतप्त सवाल केला बिहार पेक्षा बिकट परिस्थिती कल्याण डोंबिवलीचे झाल्याचे त्यांनी सांगितले .


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केलेलं आरोप हे सिद्ध करावेत अन्यथा एक रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा मनसेने दिला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांचे नाव एका प्रकरणाशी गोवून बदनाम करण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु आहे. संबंधित प्रकरणाशी कोणताही संबंध नसतानाही जाणीवपूर्वक आमदार राजू पाटील यांचा नाव घेण्यात आल्याने मनसेने एक रुपयांचा दावा न्यायालयात दाखल करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडे असलेले पुरावे त्यांनी सादर करावेत अन्यथा न्यायालयीन लढ्याला सामोरे जावे असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.