ठाणे : उल्हासनगरमधील शहाड फाटकाच्या नजीक सेंच्युरी रेयॉन कंपनीत (Century Rayon Company) केमिकल टँकरचा ब्लास्ट झाला असून या ब्लास्टमध्ये दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमी मजुरांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. इंडस्ट्रियल विभागाचे अधिकारी भेट देतील आणि त्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल अशी माहिती देण्यात आली आहे. 


सकाळी साधारणपणे 11 वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी स्फोट झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. टँकर मधून केमिकल काढत असताना हा विस्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहेत तर पाच जण गंभीर झाल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी दिली आहे. 


या घटनेचं नेमकं कारण समोर आलं नसून इंडस्ट्रियल विभागाचे अधिकारी या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर यामागचं कारण समजू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या जखमी मजुरांना भेटण्यासाठी घटनास्थळी भाजपा आमदार कुमार आयलानी तसेच शिवसेना नेते राजेंद्र चौधरी दाखल झाले असून त्यांनी जखमी रुग्णांची भेट घेतली आहे.