Thane News : ठाणे (Thane) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना टिटवाळा वासुंदरी पाटील नगरमध्ये घडली आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिना अन्सारी 8 वय वर्षे तर दुसरी रिया अन्सारी 18 वर्षे वयाच्या दोघी सख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. 

Continues below advertisement


टिटवाळा वासुंदरी पाटील नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन बहिणींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही बहिणी कपडे झुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. नेमकी ही घटना कशी घडली याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही धक्कादायक घटना


सोलापूर (Solapur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळपासून एक काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आली असून त्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


महत्वाच्या बातम्या:


नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या