Thane : ठाण्यातील (Thane) कासारवडवली परिसरातील तलावामध्ये एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनासह अग्निशामक दल त्याचबरोबर कासरवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारीही दाखल झाले. सर्वांच्या मदतीने तलावातील मुलाला रेस्क्यू करुन सिविल रुग्णालयमध्ये पाठवण्यात आले आहे. या बारा वर्षीय मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा पाचवीत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
'ठाण्यातील कासारवाडीत धक्कादायक घ़ना घडली आहे. एक 12 वर्षाच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्वांच्या मदतीने बुडालेल्या मुलाला बाहेर काढलं आहे.
आज राज्याच्या विविध भागात धक्कादायक घटना
आज राज्याच्या विविध भागात धक्कादायक घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड (pune) तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत 7 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मुरबाड पुलावरुन 15-20 फूट ओढ्यात कार कोसळली; एकजण गंभीर जखमी
मुरबाड तालुक्यातील सावरणे-थिदबी रस्त्यावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला असून, वाहन पुलावरून 15 ते 20 फूट खोल ओढ्यात पडले आहे. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, मुरबाड-माळशेज परिसरात मुंबई आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. असाच एक पर्यटक सावरणे परिसरात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आला असता, वळणावरील ओढ्याच्या पुलाचा अंदाज न आल्याने वाहन थेट खाली कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या: