Thane Shahapur News :  ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील चेरपोली गावांमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सख्या तीन बहिणींना विषबाधा झाल्यानं मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईची संशयास्पद भूमिका असल्यानं पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. नेमकी विषबाधाच झाली की दुसरे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं चेरपोली गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

उपचार सुरु असतानाच या तिन्ही मुलींचा मृत्यू  

काही दिवसापूर्वी या मुलींच्या आईचे पतीसोबत घरगुती भांडण झालं होतं. यामुळं आई शहापूर तालुक्यातील अस्नोली गावी तिच्या माहेरी मुलींना घेऊन गेली होती. त्या ठिकाणी मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती समजताच 2 मुलींना मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. तर एका मुलीला शहापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच या तिन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.

मृत मुलींची नावे 

1) काव्य संदीप भेरे - वय(10)

2) दिव्य संदीप भेरे - वय (8)

3) गायत्री संदीप भेरे - (6)

या घटनेत मुलींना फुड पॉयझन झालं आहे की विषबाधा की अन्य काही हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर माहित पडणार आहे. मात्र आईची भूमिका संशयास्पद असल्याने पोलिसांकडून ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. 

एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ

दरम्यान, एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी मुलींना विषबाधा झाली की दुसरे काही आहे, याबाबतचा तपास देखील सुरु आहे. दरम्यान, या तिन्ही मुलींच्या मृत्यूबाबत मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका वाटत असल्यानं पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं आहे. मुलींच्या आईची पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मुलींना त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच तुन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका मुलींचा मृत्यू कशामुळं झाला याची माहिती समोर येणार आहे. मात्र, विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

लग्नाच्या 12 दिवसातच विवाहितेचा मृत्यू, हुंड्यासाठी विष पाजवून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप; नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार