Thane municipal corporation elections 2022 : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणोकर येथे पार पडला. पालिका शाळेतील विद्याथ्र्यांच्या हातातून चिठ्ठी काढत हे आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये नागरीकांचा मागासवर्ग, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या 15 जागांसाठी सोडत काढण्यात आली. तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 22 जागा चिठ्ठी काढून महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या.

    


नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (पुरुष)
निवडणूक आयोगाने नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 पैकी 7 जागा या पुरषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यानुसार 16, 17, 20, 26, 28, 32 आणि 47 या प्रभागातील ‘अ’ जागा आरिक्षत झाल्या आहेत.
सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण
ओबीसी आरक्षणामुळे सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण देखील रद्द करण्यात आले होते. ठाणो महापालिकेत 142 जागांपैकी 71 जागांवर महिला निवडून येणार आहेत.  त्यानुसार यापूर्वी अनुसूचित जाती आणि जमातासाठी आरक्षण काढण्यात आल्याने शुक्रवारी यातील 56 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार 56 पैकी प्रभागातील अ मधील 20 जागा आणि ब मधील 14 जागा थेट आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत 22 ब मधील जागांसाठी चिठय़ा काढण्यात आल्या. त्यानुसार प्रभाग क्रमांक 1, 2, 4, 5, 7, 8,9, 11, 12, 13, 14, 15, 21, 22, 25, 31, 35, 38, 40, 42, 45 आणि 46 मधील ब जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित झाल्या.


कोणाला फटका ? 
घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे नरेश मणेरा आणि सिद्धार्थ ओवळेकर असे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एकाला आरक्षणाचा फटका बसणार असला तरी त्या नगरसेवकाला शेजारच्या म्हणजेच 5 क्रमांकाच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात येणार असल्याचे समजते. तर, प्रभाग क्रमांक 9 मधून  स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे निवडणुक लढविण्याच्या तयारीत होते. परंतु या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने त्याचा फटका संजय भोईऱ यांना बसला आहे तर त्यांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. तर, प्रभाग क्रमांक 8 मधून  माजी महापौर एच.एस. पाटील आणि माजी नगरसेवक संजय पांडे हे निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून याठिकाणी दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 


सोडतीचा फायदा 
गेल्या निवडणुकीत राबोडी भागातून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे दोघे एकाच प्रभागातून निवडून आले होते. या भागात नव्या रचनेत प्रभाग क्रमांक 18 तयार करण्यात आला असून त्याठिकाणी दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे सुहास देसाई यांना आरक्षणाचा फटाका बसल्याचे बोलले जात होते. परंतु जुने आरक्षण रद्द होऊन नव्या आरक्षणात या प्रभागात एकच जागा महिलांसाठी राखीव झाल्याने देसाई यांचा निवडणुक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.