Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेमध्ये (Thane Municipal Corporation election) भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू करण्यात आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील (Mahayuti tension) संघर्ष टोकाला जात असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका स्वबळावर लढा, अशी मागणी नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली. या संदर्भात काल (15 ऑक्टोबर) रात्री उशिरा बैठक पार पडली. 

Continues below advertisement


भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगला (BJP Shiv Sena conflict)


आनंद आश्रममध्ये खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा पाढा वाचण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी भाजपचे पदाधिकारी शिवसेना नगरसेवक पदाधिकारी करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे आणण्यात असल्याचा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजून करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, भाजपकडून ठाणे महापालिकेमध्ये स्वबळाची तयारी सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगला आहे. ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष घातलं असून शिंदे पिता पुत्रावर त्यांनी सडकून प्रहार सुरु केला आहे. त्यामुळे महायुतीमध्येही मिठाचा खडा पडला आहे. 


नवी मुंबईतही भाजपचाच महापौर व्हायला हवा (Ganesh Naik vs Eknath Shinde) 


दुसरीकडे, नवी मुंबईतही भाजपचाच महापौर व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांनी मांडल्याची चर्चा आहे. महायुती करायची की नाही यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र बसा आणि आम्हाला कळवा. नवी मुंबईसारख्या शहरात भाजपचा महापौर व्हायला हवा अशाच पद्धतीची आखणी करायला हवी, अशा सूचना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिल्याने आगामी काळात शिंदे नाईक संघर्षाला आणखी धार येणार आहे. दुसरीकडे, दोन आठवड्यांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत एका हाॅटेलमध्ये पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. या बैठकीत त्यांनी नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे आनंद दिघे यांचे स्वप्न होते. दिघे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची वेळ आता आली आहे, असे सूचक वक्तव्य केले होते.  


इतर महत्वाच्या बातम्या