ठाणे :  मुंब्य्रातील (Thane Mumbra)  शिवसेनेच्या शाखेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंब्य्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  मुंब्य्रातील शाखेला भेट देणार असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी संजय राऊतही (Sanjay Raut) उपस्थित असतील. ठाकरे गटाची शाखा बुलडोझरनं तोडल्यानंतर शिंदे गटानं त्याचठिकाणी कंटेनरमध्ये शाखा सुरु केली आहे. 


शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला  उद्धव ठाकरे हे स्वतः सायंकाळी भेट देणार आहेत. दरम्यान  शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन राजन किणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर किणे यांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील ही नोटीस बजावण्यात आली असून जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पाचपेक्षा अधिक  कार्यकर्ते हे एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. दरम्यान उद्धव ठाकरे हे मुंब्य्रातील  शाखेला भेट देऊन तेथील आढावा घेत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत.


मुंब्रा शाखेच्या आसपास 100 मीटर पर्यंत कोणालाही प्रवेश नाही


ऐन दिवाळीत ठाण्यातील मुंब्रा परिसरतील  राजकारण तापताना दिसून येत आहे. उध्दव ठाकरे यांना ठाणे पोलिसांची एकतर्फी नोटीस बजावण्याचे शक्यता आहे.  मुंब्रा येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस 144 कमल लागू करण्याची शक्यता आहे. कलम 144 नुसार मुंब्रा शाखेच्या आसपास 100 मीटर पर्यंत कोणालाही प्रवेश देणार नाही. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करण्यात येणार प्रवेशबंदी आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी  महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमणार आहेत सोबतच शिंदे गटाचे आणि एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते देखील नम्र असल्याने विरोध प्रदर्शन होऊ शकते  त्यामुळे प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 


शिंदे गटाने शाखा ताब्यात घेतली


मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढले. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केला. आनंद दिघे यांच्या काळात ही शाखा रस्ता रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी आमच्या सहकार्याने बनवली होती. मात्र आता याची दुरवस्था झालेली आम्हाला बघवली नाही. वर्षातून काहीच दिवस शाखा उघडण्यात येत होती. त्यामुळे ही शाखा धूळ खात पडली होती. मात्र शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी घोषित झाल्याने आम्ही आमच्या हक्काच्या शाखेत प्रवेश केला असल्याचं शिंदे गटाचे राजन किणे यांनी स्पष्ट केलं. 


हे ही वाचा:


मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वे अपघाताचा धोका? नागरिकांचे हात-पाय शाबूत राहतील याची काळजी घ्या : हायकोर्ट