Thane Election Reservation : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 131 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित 65 जागा या सर्वसाधारण गटासाठी असतील.
ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यातून एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहे. यात अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. तर महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. यात 30 प्रवर्गासाठी मंगळवारी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी, 32 प्रभाग हे चार सदस्यीय असून 1 प्रभाग तीन सदस्यीय आहे. या 33 प्रभागातून एकूण 131 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
Thane Election Ward Reservation 2025 : ठाणे महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या - 132
सर्वसाधारण प्रवर्ग - 84
महिला राखीव- 41
सर्वसाधारण - 43
ओबीसी प्रवर्ग - 35
महिला - 18
सर्वसाधारण ओबीसी - 17
अनुसूचित जाती - 9
अनुसूचित जाती महिला - 5
अनुसूचित जाती सर्वसाधारण - 4
अनुसूचित जमाती - 3
अनुसूचित जमाती महिला - 2
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - 1
Thane SC Ward : अनुसूचित जातीसाठी कोणते वॉर्ड?
राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी सुरवातीला ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील शाळा क्रमांक 7 मधील पियू गौर आणि अवंशीता प्रजापती या आठवी इयत्तेतील दोन विद्यार्थीनीकडून आरक्षण सोडत काढण्यात आली. यात प्रथम अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 5 जागांची सोडत काढण्यात आली. यात सर्वात प्रथम 22 (अ) या प्रवर्गाची चिठ्ठी निघाली. त्यानंतर 6 (अ), 3 (अ), 7 (अ), 24 (अ) या प्रवर्गाची चिठ्ठी करण्यात आली.
Thane ST Ward : अनुसूचित जमातीसाठी कोणते वॉर्ड?
त्यानंतर, अनुसूचित जमातीच्या 2 प्रभागांच्या जागांसाठी सोडत काढली गेली. यात 5 (अ) 2 (अ) या दोन प्रवर्गांचे आरक्षण निघाले.
Thane OBC ward : ओबीसी आरक्षण कोणत्या वॉर्डात?
नागरिकांच्या मागास प्रर्वगाकरिता 35 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी 18 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात 1(ब ), 9(ब ),15(ब ),16(ब ), 28(ब ) थेट महिला आरक्षण पडले. तर उर्वरित 26 पैकी 11 जागांचे आरक्षण सोडत काढण्यातआली. यात 6(ब), 3(ब), 24(ब), 17(अ), 29(अ), 19(अ), 14(अ), 10(अ), 7(ब), 8(अ), 26(अ) याचे आरक्षण प्रत्यक्ष सोडतीद्वारे काढण्यात आले.
यावेळी ठाणे पालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी हे उपस्थित होते. तसेच विविध पक्षाचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही आरक्षण सोडत पार पडल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते पियू गौर आणि अवंशीता प्रजापती या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
ही बातमी वाचा: